पुणे

मासळी स्वस्त; चिकन, अंडी महागली

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून बाजारात मासळी दाखल होत आहे. व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाल्याने बाजारात मासळीच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, पापलेट वगळता अन्य मासळीच्या दरात घसरण झाली आहे. यामध्ये सुरमई, बांगडा व बोंबीलच्या भावात सर्वाधिक घसरण झाल्याचे सांगण्यात आले. श्रावणात घटणार्‍या मागणीमुळे पोल्ट्री उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. परिणामी, बाजारात पक्ष्यांसह अंडीची आवक घटली आहे. श्रावणामुळे चिकन व अंडीला मागमी कमी असली, तरी त्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये, तर इंग्लिश अंडी शेकड्यामागे पंधरा रुपयांनी वधारली आहेत. गावरान अंडी व मटणाचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 27) खोल समुद्रातील मासळीची 8 ते 10 टन, खाडी 200 ते 300 किलो, नदीच्या मासळीची 700 ते 800 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 10 ते 12 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1400-1500, मोठे : 1300-1400, मध्यम : 900-1000, लहान : 600-700, भिला : 550, हलवा : 600-700, सुरमई : 400-700, रावस : 500-600, घोळ : 600-700, करली : 300-400, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 300-360, पाला : 900-1400, वाम : काळी 200-280 पिवळी 400-480, ओले बोंबील : 80-160. कोळंबी : लहान 120-240, मोठी : 300-480, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 600-700, लॉबस्टर : 1400-1500, मोरी : 200-320, मांदेली : 100-140, राणीमासा : 160-200, खेकडे : 200-280, चिंबोर्‍या : 400-500. खाडीची मासळी : सौंदाळे : 200-300, खापी : 180-240, नगली : 360-400, तांबोशी : 400-440, पालू : 200-240, लेपा : 120-160, बांगडा : लहान 100 मोठा 120-180, शेवटे : 200-240, पेडवी : 80-100, बेळुंजी : 120-160, खुबे : 100-120, तिर्सर्‍या : 160-200 तारली : 160-180.

नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 140-180, मरळ : 280-360, शिवडा : 160-200, खवली : 160-200, आम्ळी : 100-140, खेकडे : 240-280, वाम : 400-480. मटण : 700, कलेजी : 740, चिकन : 210, लेगपीस : 260, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 490, डझन 66, प्रतिनग 5.5.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT