पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘फिट इंडिया’ची संकल्पना साकार होण्यासाठी पुण्यात पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे दीपोत्सवानंतर पुणेकरांना खेलोत्सव अनुभवता येणार आहे, अशी महिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा सर्वांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्या सर्व खेळांच्या स्पर्धा होतील. 33 प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी बुद्धिबळ व कॅरम, दिव्यांगांसाठी बास्केटबॉल व पोहण्याची स्पर्धा घेणार आहेत. या वेळी मनोज पिंगळे, विलास कथुरे यांनी माहिती दिली.
नरेंद्र मोदी यांनी देशातील क्रीडा विकासाचा रोडमॅप मांडला. खेलो इंडियासारख्या स्पर्धा सुरू केल्या. खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. तालुका पातळीवरही या सुविधा विकसित होण्यासाठी अर्थसहाय्य द्यायला सुरुवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा महोत्सव आहे. त्यातूनच देशाला ऑलिंपिक स्पर्धेसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचे देशवासीयांनी पाहिले.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र