पुणे

विमाननगरच्या आयटी हबमध्ये आग ; आगीदरम्यान इमारतीत होते तब्बल दोन हजार कर्मचारी

अमृता चौगुले

पुणे/वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा :  विमाननगर परिसरातील आयटी बिझनेस हबमध्ये मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. आयटी बिझनेस हबमधील तळघरातील इलेक्ट्रीक खोलीत आग लागली होती. धूर नवव्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने घबराट उडाली. येथील दोन हजार कर्मचार्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.

अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून पाऊण तासात आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. हायड्रोलिक क्रेनवर चढून नवव्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याचा मारा करीत ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली. आग नियंत्रणात आल्यानंतर बराच वेळ कूलिंगचे काम सुरू होते.
ऐन उन्हाच्या धगीत ही आग लागल्याने आयटीतील कर्मचारी घाबरून गेले होते.

SCROLL FOR NEXT