पुणे

दौंड रेल्वे स्थानकात बंद बोगीला आग

अमृता चौगुले

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड रेल्वे स्थानकालगत प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या शेजारी उभ्या असलेल्या एका प्रवासी बोगीला सोमवारी (दि. 17) पावणेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी ही आग आटोक्यात आणली.

रेल्वे स्थानकालगत हा प्रवासी गाडीचा रेक गेल्या अनेक दिवसांपासून उभा आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीदेखील अशीच आग लागली होती. मागील वेळेस व आजदेखील जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही आग कशी लागली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, आगीची घटना कळताच रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलिस, आरपीएफचे कर्मचारी ताडतडीने घटनास्थळी पोहोचले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT