Fire Breaks Out at Hotel Near Kelgaon Chowfula
यवत: केडगाव चौफुला(ता.दौंड)येथील रघुनंदन हॉटेल ला भीषण आग लागली असून यात हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव चौफुला येथे प्रसिद्ध असणाऱ्या रघुनंदन हॉटेल ला पहाटे पाच वाजनाच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
यात हॉटेल मधील फर्निचर सह इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. चौफुला परिसरात अद्ययावत पद्धतीने काही वर्षांपूर्वी या हॉटेल चे बांधकाम करण्यात आले आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आग आटोक्यात आणली असून पोलीस आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत. https://www.youtube.com/watch?v=OXMPme41kg8