बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती एमआयडीसीतील हॉटेल अभिजित अॅण्ड लॉजिंग येथे दोन महिलांमार्फत स्वतःच्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेणार्या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास पांडुरंग चौधर (रा. तृप्ती कॉम्प्लेक्स, रुई, बारामती), हॉटेल व्यवस्थापक तेजस पोपट ऐवळे (सध्या रा. रुई, मूळ रा. महिम, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व हॉटेल मालक महिलेचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली.
पोलिस हवालदार रामचंद्र कानगुडे यांनी याबाबत फिर्याद दिली. बुधवारी (दि. 19) ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलिस नाईक अमोल नरुटे, महिला पोलिस हवालदार अंजना नागरगोजे, रचना काळे, शशिकांत दळवी यांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठविला.
त्याने लॉजमध्ये जात मुलीची मागणी केली. त्याला 2100 रुपये देण्यास सांगण्यात आले. या वेळी त्याने बाहेरील बाजूस दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लागलीच छापा मारला. लॉजच्या पहिल्या मजल्यावर एक व्यक्ती खुर्ची टाकून बसला होता. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता, त्याने तेजस ऐवळे असे नाव सांगितले. तेथील खोली क्रमांक 101 मध्ये पोलिसांनी पाहणी केली असता तेथे दोन महिला बसलेल्या दिसल्या. या महिलांकडून तेथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी हॉटेल मालक महिलेसह या दोघांविरोधात गुन्हा दाखल