पुणे

लोणावळा: विनयभंग करणार्‍या हॉटेलमालकावर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

लोणावळा (पुणे) : येथील हॉटेलमध्ये काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करणार्‍या हॉटेल मालकाविरुद्ध तसेच या महिला कर्मचार्‍याच्या थोबाडीत मारून व तिचे डोके लोखंडाच्या कपाटावर आदळून तिला दुखापत करणार्‍या मालकाच्या मुलीच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहरातील हॉटेल कैलास पर्बत याठिकाणी काम करणार्‍या एका 35 वर्षीय महिलेने याबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मागील सहा महिन्यांपासून हॉटेलचे मालक किशोर काकुमल केसवानी (रा. कैलास पर्बत हॉटेल, वलवण, लोणावळा) हे पीडित महिलेला ऑफिसमध्ये बोलावून तिला शिवीगाळ करत नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होते. तसेच, 5 मे रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास हॉटेल मालकाची मुलगी राधिका किशोर केसवानी यांनी विनाकारण पीडित महिलेवर राग काढण्याच्या हेतूने तिच्या थोबाडीत मारली व डोके लोखंडाच्या कपाटावर आदळून डोक्याला दुखापत केली. या घटनेचा तपास पोलिस हवालदार उंडे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT