पुणे

पुणे: अवैध दारू विक्रीबाबत 5 जणांवर गुन्हा

अमृता चौगुले

मंचर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील रांजणी, वळती, अवसरी खुर्द, थोरांदळे येथे अवैध दारू विक्री करणार्‍या 5 जणांवर मंचर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण 22 हजार 490 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. निकू तालू भोसले (वय 39, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव), बाळासाहेब भागाजी इथापे (वय 45, रा. कारमळा, रांजणी, ता. आंबेगाव), चंद्रशेखर दीपक दांडगे (वय 26, सध्या रा. थोरांदळे, ता. आंबेगाव; मूळ रा. खुपटा, ता. सिल्लोड), रमेश शंकर भोर (वय 60) व राधा शंकर भोर (वय 55, दोघे रा. भोकरवस्ती, वळती, ता. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अवसरी खुर्दच्या खालची वेस येथे निकू भोसले हा देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 2 हजार 100 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. रांजणी येथे हॉटेल सूर्यामध्ये बाळासाहेब इथापे हा देशी-विदेशी दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडे 4 हजार 850 रुपयांची दारू मिळून आली. थोरांदळे येथील न्यू सरगम हॉटेलमध्ये चंद्रशेखर दांडगे हा दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडून 2 हजार 100 रुपयांची दारू जप्त केली, तर वळतीच्या भोकरवस्ती येथे रमेश व राधा भोर हे दोघे देशी दारू विकत होते. त्यांच्याजवळून 13 हजार 440 रुपयांची दारू जप्त केली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

SCROLL FOR NEXT