पुणे

अखेर दस्तनोंदणीचा सर्व्हर सुरू

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुद्रांक शुल्क विभागाचा बंद पडलेला सर्व्हर गुरुवारपासून (दि. 20) पुन्हा सुरू झाला. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दस्तनोंदणीचे ठप्प झालेले कामकाज सुरू झाले. तांत्रिक अडथळे आल्यामुळे सर्व्हर बंद पडला होता. जुनाट झालेली सर्व्हर यंत्रणा आधुनिक करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिली. गुरुवारी (दि. 20) दुपारनंतर यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू झाली, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT