पुणे

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांत तुफान मारामारी; पुण्यातून मुंबईला जाताना घडली घटना

अमृता चौगुले

पुणे : पुण्याहून मुंबईला निघालेल्या रेल्वेच्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (दि. 10) सकाळी जागेवर बसण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या पुढे गाडी गेल्यावर घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळी मुंबईला निघालेल्या या गाडीमध्ये प्रवाशांची जागेच्या कारणावरून वादावादी झाली. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाकडे अद्याप तक्रार आलेली नाही. पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांचे डबे वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

गाडीमध्ये जागेवरून अशा प्रकारे वाद करणे चुकीचे आहे. बुधवारी घडलेली घटना अतिशय निंदनीय आहेे. रेल्वे प्रवासी आणि संघटनांच्या आम्हाला गाड्यांचे डबे वाढविण्यासंदर्भात अनेक मागण्या आल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल.

                                       – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT