पुणे

पुणे : पीएमपीची मेट्रो स्टेशन्ससाठी फीडर सेवा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीकडून प्रवाशांकरिता वनाज ते रुबी हॉल मेट्रो स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान मंगळवारपासून (दि. 2) फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे. अशी आहे पीएमपीची फीडर सेवा – शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट रूम- (वर्तुळाकार) – कुंभारवाडा, आंबेडकर भवन, मोलोदिना, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे स्टेशन डेपो, साधू वासवानी चौक, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, आंबेडकर भवन, गाडीतळ, आरटीओ, इंजिनिअरींग कॉलेज, सिव्हिल कोर्ट गेट नं 4, कामगार पुतळा, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. पिंपरी-मनपा स्टेशन ते काळेवाडी फाटा – (वर्तुळाकार) – शगुन चौक, डिलक्स, काळेवाडी, काळेवाडी फाटा.

पिंपरी मनपा स्टेशन ते घरकुल – (वर्तुळाकार) – घरकुल, संभाजीनगर, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, मोरवाडी, पिंपरी मनपा स्टेशन.
नाशिक फाटा (भोसरी) – (वर्तुळाकार) – संतनगर भोसरी – इंद्रायणीनगर, गवळीमाथा, नेहरूनगर, वायसीएम हॉस्पिटल.
दापोडी ते नवी सांगवी – (वर्तुळाकार) – दापोडी मेट्रो स्टेशन, सीएमई गेट, शिवाजी पुतळा, वसंतदादा पुतळा, पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी, काटे पुरम चौक, पिंपळे गुरव, रामकृष्ण मंगल कार्यालय, चर्च, सीएनजी पंप फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्टेशन.

SCROLL FOR NEXT