पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी 25 वर्षीय नराधम सावत्र बापाला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर बाललैंगिक अत्याचारा-विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडला असून, पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली आहे.
आरोपी हा फिर्यादींचा दुसरा पती आहे. लग्न झाल्यापासून ते एकत्र राहत होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादींच्या पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती राहिली. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.