पुणे सातारा महामार्गावर कार-कंटेनरचा भीषण अपघात; 2 जण गंभीर जखमी Pudhari
पुणे

Accident News: पुणे सातारा महामार्गावर कार-कंटेनरचा भीषण अपघात; 2 जण गंभीर जखमी

कोल्हापूरचे दोन जण गंभीर जखमी; चार किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

Pune Accident: मुंबईवरून मूळगावी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार मधील दोनजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात साडेतीन वर्षाची मुलीसह तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहे. पुणे सातारा महामार्गावर चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी राजगड पोलिसांनी धाव घेतली असून परिस्थिती हाताळण्याचे काम सुरू आहे.

सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, ( पत्नी ) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, ( मुलगा ) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, ( नात ) इरा पाटील वय साडेतीन वर्ष (सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे असून ही घटना पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा ( ता. भोर ) येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, पुणे - सातारा महामार्गावरून चेलाडी उड्डाणपूल पास केल्यानंतर साताऱ्याच्या दिशेने जाणारी कार क्र एम. एच ०९ जी. यू. ०३३४ जात असताना पाठीमागून येणारा औषधाने भरलेला भरधाव कंटेनर क्र. एम. एच ४६ बी. यु १८६३ वरील चालकाचे नियंत्रण सुटून कारला धडक देत थेट महामार्गावरील पुलाच्या मधोमध जाऊन कंटेनर लटकला आहे.

घटनास्थळी राजगड पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. महामार्गावर एक पदरी लेन निर्माण झाल्याने देगाव फाटा ते वरवेपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अपघातातील कार व कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

अपघातप्रवण क्षेत्रामुळेच अपघात..

पुणे - सातारा महामार्ग देगावफाटा येथे ओढ्यावरील पुलाचे काम रखडले आहे. तसेच अरुंद रस्ता आणि अपघातप्रवण क्षेत्र झाल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. या अपघात प्रवणक्षेत्रकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने हा अपघात झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT