पुणे

भातपीक जोमातआल्याने शेतकरी आनंदात

अमृता चौगुले

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मावळातील बहुतांश शेतकरी भाताची लागवड करतात. भातपीक जोमात आले असून शेतकरी आनंदित झाले आहे. तर दुसरीकडे भातपिकांना लोंब्या लगडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दसरा झाल्यावर महिला शेतकरी भातपिकामध्ये तण, खेड काढण्याची लगबग करताना दिसत आहे. भातपिकामधील खेड काढल्यावर ज्या वेळी भातकापणी, झोडणी केली जाते. त्यामधून पुढल्या वर्षीसाठी बियाणे साठवले जाते व ते बियाणे पेरण्यासाठी वापरता येते.

त्यामुळे त्या मध्ये खेड उगवू नये, या साठी ही खेड काढली जाते, असे महिला शेतकर्‍यांनी सांगितले. मावळ तालुक्यातील पवनमावळ, आंदरमावळ व नाणेमावळ भागात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने व पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

SCROLL FOR NEXT