पुणे

‘रिंगरोड’च्या दराबाबत एजंटांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रिंगरोडसाठी जमिनीचे दर निश्चित करताना मागील तीन वर्षांतील परिसरातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, रेडीरेकनरचे दर, बागायत, जिरायत तसेच बिगरशेती जमीन अशा विविध गोष्टींचा विचार करून दर निश्चित केले आहेत. खेड तालुक्यात काही शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा दर मिळाला आहे. परंतु हे दर निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात एजंट सक्रिय झाले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा अधिक दर मिळवून देऊ सांगत हे एजंट शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्यात रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. रिंगरोडसाठी जमिनीचे दर नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये खेड तालुक्यातील 12 गावांमध्ये 614 गटांमध्ये तब्बल 292 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यात काही गटातील शेतक-यांना हेक्टरी तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा दर मिळाला आहे. यामध्ये काहींना 4 कोटी, अडीच कोटी, तर 1 कोटी असेदेखील दर मिळाले आहेत. जमिनीचा प्रकार, जागेचे दर, रेडीरेकनर दर अशा सर्व गोष्टींचा विचार करून हे दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु जाहीर दराबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT