यवत, पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आणि अदानी यांचे खासगी विमानतळ या चर्चा जोर धरू लागल्याने दौंड तालुक्यातील खोर, वाखारी, देऊळगाव गाडा तसेच पुरंदर तालुक्यातील राजुरी, रिसे- पिसे या ठिकाणी शेतजमीनांना सोन्याचा भाव येऊ लागला आहे.
पुणे शहर, हवेली तालुका, मुंबई भागातील मोठे गुंतवणूक दार या भागात जमिनी घेण्यासाठी उत्सुक झाले असून, यापूर्वी डोंगर माळाला कोणीही विचारत नव्हते त्या डोंगराला आता एकरी 10 लाख रुपयांपर्यंत बाजारभाव मिळू लागला आहे तर सपाट जमिनीचे बाजार 40 लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत.
आगामी काळात विमानतळ पुरंदर तालुक्यात कुठेही झाले तरी किंवा अदानी चे खासगी विमानतळ झाले तरी वरील गावातील जमिनींना महत्व राहणार आहे त्याच दृष्टीने या भागात आता गुंतवणूकदारांच्याआलिशान गाड्या आता फिरू लागल्या आहेत.
शेतकरीही आता सावध,शिक्षित झाल्यामुळे सर्व चौकशी करूनच अंदाज घेऊन जमिनीच्या किंमती ठरवत आहेत.