पुणे

पुणे जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर अतिशय उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोणत्याही अटी आणि शर्थींशिवाय हा गणेशोत्सव असल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. अशाच उत्साही वातावरणात अनंत चतुर्दशीदिनी शुक्रवारी (दि. 9) श्री गणेशाला ठिकठिकाणी निरोप देण्यात आला. अतिशय शांततापूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक काढून हा गणेशोत्सव सोहळा थाटात पार पडला.

दहा दिवस घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान गणरायांना निरोप देताना गणेशभक्तांचे मन हेलावले होते. ग्रामीण भागात असलेले जलस्त्रोत प्रामुख्याने नदी आणि काही ठिकाणी विहिरींमध्ये विधिवत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी संबंधित प्रशासनाद्वारे तर काही ठिकाणी विविध सामाजिक संस्थांद्वारे पुढाकार घेण्यात आला.

परिणामी नदी प्रदूषण टाळण्यात अशा ठिकाणी यश आल्याचे बघावयास मिळाले. गणेश विसर्जनादरम्यान ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्ये, हलगी, तर काही ठिकाणी डीजेचादेखील आवाज ऐकायला मिळाला. पोलिस प्रशासनानुसार सर्वच ठिकाणी वेळेत विसर्जन मिरवणुका  पार पडल्या.

SCROLL FOR NEXT