दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून चाहत्यांनी गर्दी केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नगर आदी जिल्ह्यातून चाहते पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठ आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे सकाळी सहा वाजल्यापासून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
'एकच वादा अजित दादा'ची घोषणाबाजी कार्यकर्ते करीत आहेत. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांची गर्दी होऊ नये म्हणून रांगा लावण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या बरोबरच खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना देखील चाहते पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत.