पुणे

बेल्हे परिसरात बनावट नोटा बाजारात; शंभर, दोनशेच्या नोटा व्यापारी, वृध्दांसाठी डोकेदुखी

अमृता चौगुले

सुरेश भुजबळ

बेल्हे : बेल्हे आणि परिसरात शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने त्या नोटा ओळखण्याचे आव्हान व्यापार्‍यांसह वृध्दांसमोर आले आहे, तर पोलिसांसमोर बनावट नोटा चलनात आणणार्‍या रॅकेटला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शंभर रुपयांची जुन्या काळातील चलनातील नोट तर दोनशे रुपयांची नव्या बंडलातील नोट चलनात वापरली गेली असल्याने असली नकलीचा फरक शक्यतो लक्षात येत नाही. शंभर रुपयांची जुनी नोट आणि दोनशे रुपयांची नव्या कोर्‍या करकरीत नोटा चलनात असल्याने नोटा घेणारी व्यक्ती नोटा तपासून घेत नसल्याने बनावट नोटा चलनात आल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जाते.

या नोटांबरोबरच दोन हजारांची नोट व्यवहारातून गत काही महिन्यांपासून दिसेनाशी झाली आहे. बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेच्या कॅशियरकडून 500 रुपयांच्या नोटा देण्यात येतात. काही वर्षांपूर्वी देशात बनावट नोटा चलनात येत असल्याने केंद्र सरकारने जुन्या हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार या नोटा बंद झाल्या आहेत.

नवीन पाचशे, दोनशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शक्कल लढवत शंभर व दोनशे रुपयांच्या असली नोटेप्रमाणेच तशीच हुबेहुब नोटा तयार करून व्यवहारात आणली आहे. त्या असली व नकली नोटांच्या कागदात फरक आहे. ज्यांना याचा अभ्यास आहे ते लोक नोट हातात पडताच ती असली की नकली ओळखतात, मात्र इतरांना फार अडचण येते.

येथील जुना मोटार स्टँड चौकाजवळील भंडारी किराणा दुकानात एका ग्राहकाने दोनशे रुपयांची बनावट नोट दिली. काही वेळानंतर संकल्प भंडारी यांच्या लक्षात आले की, नोट बनावट आहे, तोपर्यंत तो ग्राहक तेथून निघून गेला होता. त्यानंतर भैरवनाथ मंदिरालगत असलेल्या हॉटेलमध्ये नास्ता झाल्यानंतर एका ग्राहकाने शंभरच्या नव्या कोर्‍या नोटा बिल अदा करताना दिल्या, त्या नोटा आठवडे बाजारच्या दिवशी गडबडीत तपासून घेतल्या नाहीत. किराणा मालाचे बिल अदा करताना किराणा दुकानदाराने त्या नोटा बाजूला काढल्यावर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. सध्या अशा प्रकारच्या नोटा देशी दारू दुकान, पेट्रोल पंप, ढाब्यावर चलनात असल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT