रोहीत पवारांची पोस्ट चर्चेत Pudhari Photo
पुणे

फडणवीस साहेब, " लक्षात ठेवा "; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही...

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा." अस लिहित रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ५२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Rohit Pawar)

काय म्हणाले रोहीत पवार

  • महाराष्ट्राच्या जनतेला शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

  • योजना का आणल्या? हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे.

  • पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही

रोहीत पवार : अहंकाराचा कळस...

पुणे येथील बालेवाडीत भारतीय जनता पक्षाचे आज (दि.२१) विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठा महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यातील ५२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

मा. फडणवीस साहेब, “पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण काल काय बोललो, हे आज लोकांना लक्षात राहत नाही,” हे आपलं वक्तव्य म्हणजे अहंकाराचा कळस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एखाद्या योजनेचे १५०० रु दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पापं, भ्रष्टाचाराचे कारनामे, सत्तेची मस्ती, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी, युवा, महाराष्ट्राची जनता विसरेल, असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर योजना का आणल्या? हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा." Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस : पब्लिक मेमरी शार्प असते...

रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर देवेंद्र फडणवीस यांचा ५२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत,

"योजना या ठीकाणी आपण आणली आहे. आणि म्हणून तुम्हाला मला एवढच सांगायचं आहे, योजना अनेक आहेत.पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही, आम्ही रोज सांगणार नाही, प्रत्येकाची तोंडी योजना असलीच पाहिजे. जो भेटेले तेव्हा, अगदी लोक वैतागलेत तरी चालतील, लग्नात गेले तरी लोकांना योजना म्हणजे काय सांगा. त्याच्यानंतर लग्न लावायला जावा. कारण पब्लिक मेमरी शार्प असते. आपण काल काय बोललो ते आज लोकांच्या लक्षात राहत नाही. आणि चांगल असत, जे सकारात्मक असते ते इको पण होत नाही. सकारात्मक जे असते ते इको करायला पण त्रास असतो. नकारात्मक गोष्टी मात्र पटकन इको होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT