पुणे

खेडमधील 96 पोलिस पाटलांना मुदतवाढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यात मुदत संपलेल्या सुमारे 96 पोलिस पाटलांना प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण आणि नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांच्या हस्ते मुदतवाढीचे पत्र देण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील सात पोलिस पाटलांसंदर्भात काही तक्रारी असल्याने त्यांना मुदत वाढ देण्यात आली नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. खेड तालुक्यात पोलिस पाटलांची 186 पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या 151 पदे कार्यरत असून, 35 पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत पोलिस पाटलांपैकी 106 पोलिस पाटलांची मुदत संपली आहे.

शासनाच्या नियमानुसार आपल्याला पुन्हा मुदत वाढ मिळावी यासाठी 103 लोकांनी खेड प्रांतकार्यालयाकडे अर्ज केले होते. त्यापैकी 96 पोलिस पाटलांना शुक्रवारी (दि.6) एकच दिवशी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण आणि नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांच्या हस्ते मुदतवाढीचे पत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात पोलिस पाटलांना मदत वाढ देण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत खेड तालुक्यातील 96 पोलिस पाटील यांना मुदतवाढीची पत्रे देण्यात आल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT