वाहनांत घरगुती गॅस भरताना स्फोट; सुदैवाने मोठी दुघर्टना टळली  Pudhari
पुणे

Pune: वाहनांत घरगुती गॅस भरताना स्फोट; सुदैवाने मोठी दुघर्टना टळली

पळसदेव येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मारुती व्हॅनमध्ये बेकायदा गॅस भरणे पळसदेव (ता. इंदापूर) येथील एकाला चांगलेच महागात पडले. घरगुती गॅस भरताना शनिवारी (दि. 19) सकाळी 9 च्या सुमारास स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. सुदैवाने उपस्थित व शेजारी खेळत असलेली लहान मुले बचावली. नजीकच्या इतर टाक्यांनी पेट घेऊन स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. यामुळे अनधिकृत गॅसचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अनधिकृतरीत्या गॅस सिलिंडर गोळा करून मारुती व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरत असताना अचानकपणे गॅस लिकेज होऊन स्फोट झाला. यामध्ये वाहनाने पेट घेतला आणि आग नियंत्रणाबाहेर गेली. त्या ठिकाणी लहान मुले खेळत होती. तसेच आणखी पाच ते सहा सिलिंडर होते. त्यातील एखादी जरी फुटली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

दरम्यान, लोणी एमआयडीसी कंपनीतील काही अधिकार्‍यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ अग्निशामक दलाला फोन लावून बोलवून घेतले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

दररोज 8 ते 10 सिलिंडरमधून काढला जातो गॅस

पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच येथील स्थानिकांकडून दररोज आठ ते दहा एलपीजी गॅस टाकीची साठवणूक करून वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये तो भरून देण्याचे काम केले जाते. शनिवारी नजीकच्या गावातील एका मारुती व्हॅनमध्ये गॅस भरत असताना ही दुर्घटना घडली. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोट पाहून येथील नागरिकांना धावपळ करावी लागली. पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT