पाटस (पुणे), पुढारी वृतसेवा: वरवंड (ता.दौंड) येथे राहत असलेले माजी सैनिक त्रिंबक हरिभाऊ भुजबळ हे कुरकुंभ येथे कामाला जात असताना पाटसमधील मस्तानी तलावाजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते जागीच ठार झाल्याची माहिती पाटस पोलिसांनी दिली.
बुधवारी (दि.१४) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. त्रिंबक भुजबळ (वय-४१) असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते वरवंड (ता.दौंड) येथे ते राहत होते. ते कुरकुंभमधील रिलायन्स कंपनीत काम करत होते. घटनेची फिर्याद नरसिंग चौधरी यांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.