पुणे

पिंंपरी : ‘एच 3 एन 2 वरील उपचारासाठी स्वतंत्र उपचार केंद्र उभारा’

अमृता चौगुले

पिंंपरी : शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एच 3 एन 2 या आजाराबाबत स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्यात यावे. तसेच, या आजारासाठी लागणारा औषध साठा योग्य प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. एच 3 एन 2 या आजाराने बाधित झालेल्या वृद्धाचा गुरुवारी (दि. 16) मृत्यू झाला. ही गंभीर बाब असून याचा गांभीर्याने विचार करावा.

सद्यःस्थितीत आपल्या शहरात या आजाराने बाधित एकही अ‍ॅक्टीव रुग्ण नाही. परंतु राज्यातील इतर शहरातील या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील मनपा रुग्णालयामध्ये या आजाराबाबत योग्य उपचार करण्यासाठी स्वतंत्र उपचार केंद्र उभारावे. तसेच या आजाराशी संबधित औषधसाठा योग्य प्रमाणात वरील सर्व रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच या आजाराचा होणारा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. त्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना द्याव्या.

SCROLL FOR NEXT