पुणे

पुणे : विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये आजपासून बायोमेट्रिकद्वारेच प्रवेश

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केलेली असून, आज (दि.14) पासून केवळ वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनाच या यंत्रणेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे.  प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांची वसतिगृहातील प्रवेशावरून गैरसोय होत असल्याची तक्रार करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विद्यापीठाच्या परिसरात मुलांची 9 तर मुलींची 10 अशी एकूण 19 वसतिगृहे कार्यान्वित आहेत.

विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित साधारण 5 हजार विद्यार्थ्यांची वसतिगृहाची मागणी असून, विद्यापीठ परिसरात गुणवत्ता व सामाजिक आरक्षण याचा विचार करून 3 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची वसतिगृहाची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह खोल्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे या ठिकाणी अधिकच्या कॉट टाकून वसतिगृहांची क्षमता वाढवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात सामावून घेतले आहे. मात्र असे करताना प्रत्यक्ष राहत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य सुविधा देण्यासाठी व्यवस्थेच्या क्षमतांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

SCROLL FOR NEXT