तिसर्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू
गुणवत्ता यादी 21 ऑगस्ट रोजी होणार जाहीर
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती
पुणे : अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाच्या दोन फेर्या पूर्ण झाल्या असून, 64 हजार 841 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता प्रवेशाची तिसरी फेरी सुरू झाली असून, तिसर्या फेरीची गुणवत्ता यादी येत्या गुरुवारी दि. 21 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईट ीसेलच्या वतीने देण्यात आली आहे. (Latest Pune News)
बीई/बीटेक अभ्यासक्रमासाठी दुसर्या फेरीत 1 लाख 83 हजार 760 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी राज्यातील 1 लाख 89 हजार 277 उमेदवारांनी पर्याय भरले होते. यापैकी 1 लाख 62 हजार 205 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले, तर 21 हजार 555 जागा अजूनही रिक्त आहेत. दुसर्या फेरीत अॅटो फ्रिज प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 16 इतकी होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
अशा विद्यार्थ्यांना 12 ते 14 ऑगस्टअखेरपर्यंत संस्थेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली. अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीत 34 हजार 931 आणि दुसर्या फेरीत 29 हजार 910 अशा एकूण 64 हजार 841 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी अद्यापही तब्बल 1 लाख 18 हजार 919 जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी तिसरी फेरी सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसर्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी : 16 ऑगस्ट
तिसर्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदणी : 17 ते 19 ऑगस्ट
तिसर्या फेरीचा निकाल : 21 ऑगस्ट
महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे ः 22 ते 25 ऑगस्ट
अभियांत्रिकीच्या शेवटच्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे ः 26 ऑगस्ट
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
प्रवेशाच्या जागा
1,83,760
एकूण अर्ज भरलेले
2,17,330
पहिल्या फेरीत अॅलॉट झालेल्या जागा :
1,44,776
पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेले :
34,931
दुसरी फेरीत अॅलॉट झालेल्या जागा :
1,62,205
दुसर्या फेरीत प्रवेश घेतलेले
29910