पुणे

पुणे : पीएमपी ठेकेदारांचा संप लवकर मिटवा; सर्वपक्षीय नेत्यांनी अध्यक्षांकडे केली मागणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी दुपारी पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन ठेकेदारांचा संप लवकर मिटवा आणि पुणेकरांना बस उपलब्ध करा, अशी मागणी केली. तब्बल 100 कोटींची बिले थकल्यामुळे रविवारी पीएमपीच्या ठेकेदारांनी दुपारनंतर आपली सेवा बंद केली. ठेकेदारांच्या जवळपास 900 बस दुपारनंतर रस्त्यावर धावल्या नाहीत. त्यामुळे पुणेकरांचे रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी सकाळी प्रवासासाठी प्रचंड हाल झाले. अजूनही ठेकेदार संपावरच आहेत.

त्यामुळे पुणेकरांचे प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाहन उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पीएमपी अध्यक्षांची भेट घेतली आणि तातडीने संपून पुणेकरांना बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावेळी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आणि कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यावेळी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT