पुणे: समाजाचे ऋण मानणारे लोक हे ख-या अर्थाने आयकॉन असतात. त्यांचे कार्य तर असामान्य असतेच परंतु त्यांच्या कार्याचा समाजावर एक प्रभाव असतो. समाजावर ज्यांच्या कार्याचा ख-या अर्थाने प्रभाव पडतो. त्यांनाच आयकॉन मानले जाते. असेच लोक समाजाला प्रेरणा देणारे असतात. जगात काही अशक्य नाही सर्व शक्य आहे असे हे लोक सांगतात. ज्याला सामाजिक जाणिवेचे भान आहे तेच लोक आयकॉन होऊ शकतात असे प्रतिपादन बँकींग तज्ज्ञ व राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले.
पुणे विद्येचे माहेरघर, आय. टी. हब, साहित्यनगरी, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहेच, परंतु त्याचबरोबर पुणे शहर म्हणजे उद्योजकांची पंढरीदेखील आहे. याच पुण्यनगरीत अनेक यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते घडलेले आहेत. अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी, महिलांनी, संस्थांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पुण्याच्या क्षितिजावर विविध क्षेत्रांमध्ये अमिट ठसा उमटवला आहे. अर्थात हे सर्व त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती, समर्थ नेतृत्व, उद्योगशक्ती आणि कल्पक दृष्टिकोन यामुळेच शक्य झाले आहे. अशा अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्वांचे जीवनप्रवास, कार्य, वाटचाल यांचे अलौकिक प्रवास वर्णन प्रदर्शीत करणारे सुंदर आखीव-रेखील संग्राह्य असे कॉफी टेबल बुक पुढारी माध्यमसमूहाच्या वतीने पुण्यातील लेमन ट्री या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गुरूवारी प्रकाशित करण्यात आले. तसेच संबंधित नामवंतांना इमिनंट आयकॉन्स पुरस्काने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनास्कर बोलत होते. यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, सहयोगी संपादक सुहास जगताप, जनरल मॅनेजर सुनील लोंढे, मार्केटिंग विभागाचे प्रमुख संतोष धूमाळ, विजय शिरगांवकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अनास्कर म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो तो समाज ज्याला चांगले म्हणतो ते चांगले आणि समाज ज्याला वाईट म्हणतो ते वाईट ही चांगले आणि वाईट याबद्दल व्याख्या करता येईल. त्यामुळे जे समाजाला चांगले वाटते ते आपण करावे आणि समाजाला जे मान्य नाही ते आपण करू नये असे बंधन आपण आपल्यावर लादावे. ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाकडून आपले कौतुक होत असेल आणि ते कौतुक जर आपल्याला हवेहवेसे वाटत असेल तर ते कौतुक प्राप्त करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य तशाप्रकारे व्यतीत केले पाहिजे अशा प्रकारचे बंधन या आयकॉनच्या माध्यमातून आपल्यावर येते. ते बंधन आपण आनंदाने पाळले पाहिजे.
विविध क्षेत्रात काम करणा-या नामवंतांना सामाजिक भान असते. त्यातून ते सामाजिक कार्यात योगदान देत असतात. या सामाजिक कार्यातून मिळणारा आनंद त्यांना व्यवसायिक प्रगतीपेक्षा कितीतरी मोठा वाटतो. त्यामुळे समाजाने जे मला भरभरून दिले आहे. त्यातील मला जे काही शक्य आहे ते मला समाजाला परत देता आले पाहिजे. याच भावनेने ही मंडळी कार्यरत असतात.
जे मोठे असते , भव्यदिव्य असते ते चांगलेच असते असे नाही. तसेच काही ज्येष्ठ, श्रेष्ठ तथाकथित मोठे लोक देखील फसवे आणि भोंदू खरातबाबासारखे असतात. असे लोक समाजाचे कधीही आयकॉन होऊ शकत नाही. तर ज्याला सामाजिक जाणिवेचे भान आहे तेच लोक आयकॉन होऊ शकतात हे सांगत असताना त्यांनी त्यांच्या आईचा पापड लाटण्याचे काम करण्यापासून ते लिज्जत पापड कंपनीच्या संचालिका होण्यापर्यंतचा आणि राज्यासह परराज्यात संबंधित कंपनीचा विस्तार आणि त्यानंतर तत्कालीन परिस्थितीत 30 ते 40 कोटींची मालमत्ता संबंधित कंपनीला परत देण्याचा प्रवास उलगडून सांगितला आणि अशा प्रकारची वृत्ती असणारे समाजाचे ऋण मानणारे लोक हे तुम्ही आहात असे स्पष्ट केले.
वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून चांगले काम करणा-या लोकांना शोधून पुढे आणणे त्यांचे काम आहे. त्यांनी जर अशा लोकांचा शोधच घेतला नाही तर समाजात चांगले लोक आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण होईल. कोणताही व्यक्ती हा चुका करतो. परंतु ती चुक उमगल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे हे ख-या माणसाचे लक्षण आहे. माझ्या चुकीमुळे समाजाचे नुकसान होऊ नये ही भावना आयकॉनच्या मनात असते.
आई-वडीलांपेक्षा समाजाकडूनच लोकांना संस्कार दिले जातात. समाजाकडून माणासांचे चित्र देखील रेखाटलेले असते. त्यामुळे कोणतेही काम करत असताना आपल्या सद्सद् विवेक बुध्दिला स्मरून काम करा त्यावेळी हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवेल. इतर संस्थांकडून मिळणा-या पुरस्कारांपेक्षा एखाद्या वृत्तपत्राकडून दिला जाणारा पुरस्कार हा सगळ्यात मोठा असतो असे देखील अनास्कर यांनी शेवटी सांगितले. दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका प्रस्ताविकात विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रविंद्र खरे यांनी केले तर मार्केटिंग प्रमुख संतोष धूमाळ यांनी आभार मानले.
वृत्तपत्रांमधील एमीनंट आयकॉन म्हणजे दैनिक पुढारी...
दैनिक पुढारी हे साप्ताहिक स्वरूपात 1937 साली सुरू झाले. त्यानंतर त्याचे 1939 साली दैनिकात रूपातंर झाले त्यामुळे जवळपास 90 वर्षांचा कालखंड असलेले हे दैनिक असून स्थानिक आणि ग्रामीण भागातील दर्जेदार वृत्तांकन दैनिक पुढारीमध्ये दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या प्ररकारचे वृत्तांकन दैनिक पुढारीत येत असून वृत्तपत्रांमधील एमीनंट आयकॉन म्हणजे दैनिक पुढारी असल्याचे गौरवोद्गार अनास्कर यांनी दैनिक पुढारीबद्दल काढले.
हे आहेत पुरस्कारार्थी
1) प्रथमेश आबनावे, खजिनदार संचालक - महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ तथा सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
2) माधुरी चाकणकर, संस्थापक, सखी संगम सामाजिक संस्था (त्यांच्याऐवजी पल्लवी अतुल चाकणकर यांनी पुरस्कार स्विकारला)
3) हुलगेश चलवादी, अध्यक्ष, पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विद्यानगर, पुणे
4) फुलचंद चाटे, संचालक, चाटे पब्लिक स्कूल
5) प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
6) विशाल छुगेरा,संस्थापक अध्यक्ष, विशाल छुगेरा प्रॉपर्टिज इंडिया प्रा. लि.
7) कैलास ओमप्रकाश धूत, संचालक, गजराज मसाले
8) कृष्णकुमार गोयल, व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर ग्रुप
9) के. जे. जाधव, संस्थापक-अध्यक्ष, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट
10) विशाल जाधव आणि किन्शुक शिकारखाने, संस्थापक संचालक, एम्पिरिक स्पेस
11) मनोहर जगताप, सीइओ-सीएफओ, आर्यन्स ग्रुप
12) डॉ. विश्वजीत कदम, सचिव, भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)
13) डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका भारती विद्यापीठ, आरोग्य शास्त्र विभाग
14) प्रा. स्वाती कराड-चाटे, विश्वस्त व महासचिव - माईर्स
एमआयटी पुणे. कार्यकारी अध्यक्षा - एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूर
(त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव राघवेंद्र चाटे यांनी पुरस्कार स्विकारला)
15) प्रितम खांदवे, अध्यक्ष, जगद् गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर आजोळ ट्रस्ट चेअरमन, साईदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लोहगाव (त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ.श्रेयस प्रीतम खांदवे यांनी पुरस्कार स्विकारला)
16) निलेश खेडेकर, संस्थापक-संचालक, एज्युटेक इंडिया
(त्यांच्याऐवजी करण खेडेकर यांनी पुरस्कार स्विकारला)
17) अॅड. नरसिंह संभाजी लगड, प्रवर्तक संचालक: नांदेड सिटी, पुणे, विश्वस्त सचिव : बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन, जम्मू काश्मीर
18)मगराज राठी, संचालक, महेश नागरी पतसंस्था
19)सुरज शर्मा, अध्यक्ष, आरआयआयएम स्कूल
20) डॉ. प्रमोद कुमार, अध्यक्ष, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (आयएसबीअँडएम)
(त्यांच्याऐवजी आयएसबीअँडएमचे प्राचार्य मनिष सिंग यांनी पुरस्कार स्विकारला )
21) डॉ. किरण ठाकूर,संस्थापक, अध्यक्ष लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी
(त्यांच्याऐवजी चंद्रकांत शिंदे आणि सुरेश बोकाडे यांनी पुरस्कार स्विकारला)
22) ध्यानगुरू रघुनाथ येमुल गुरुजी
(त्यांच्याऐवजी निलिमा येमुल यांनी पुरस्कार स्विकारला)
23) सुनिल राठोड, संचालक, फोनिक्स लँडमार्क्स