अल्पवयीन मुलीवर अत्याचार  File Photo
पुणे

विकृतीने गाठला कळस ! नराधम पित्याकडून अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

शहरातील बाललैंगिक अत्याचार्‍यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले असतानाही काही नराधमांनी मात्र याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. नराधमांकडून ओळखीच्या आणि नात्यातील अल्पवयीन मुलींना वासनेचे शिकार बनविले जात आहे. शहरात बाललैंगिक अत्याचाराच्या तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटनांमध्ये तिघांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केला आहे, तर एका तरुणीला फिरण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

आपल्या अकरा वर्षांच्या मुलीला मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर घरी कोणी नसताना पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नराधम पित्याला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी ही अकरा वर्षांची असून, सध्या ती सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नुकताच तिच्या शाळेत गुड टच बॅड टचविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या वर्गशिक्षिकेला आणि तेथे कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्यांना सांगितला. तिने सांगितले की, वडिलांनी मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार एक वर्षापासून सुरू असल्याचेही तिच्या वतीने शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आलेकर करत आहेत.

बारा वर्षांच्या मुलीचा विनयभंग 30 वर्षांच्या एकावर गुन्हा दाखल

बारा वर्षांच्या मुलीला अडवून तिचा हात हातात घेऊन तिला तू मला आवडतेस, म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराच्या कलमानुसार, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश सिद्धलिंग बुगडे (वय 30, रा. महादेवनगर, वडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरदरम्यान घडला. या दरम्यान आरोपी बुगडे याने मुलीशी इन्स्ट्राग्राम अकाउंटवरून चॅटिंग केले. तसेच, तिला फोन करून तिचा छुपा पाठलाग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक निंबाळकर करत आहेत.

तरुणीवर बलात्कार

तरुणीशी ओळख वाढवून तिच्याशी मैत्री करून तिला फिरण्यास नेऊन व लग्नाचे आमिष दाखवून एकाने कात्रज येथील एका लॉजवर बलात्कार केला. याप्रकरणी सिद्धेश कृष्णा तुपे (वय 22, रा. दत्तनगर, कात्रज) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडला.

दोन तरुणांवर ‘पोस्को’ गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन तरुणांवर पॉस्कोअंतर्गत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी दिली. राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेशानुसार आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. नारायणगाव पोलिसांनी समर्थ विनोद वर्पे (वय 18), किरण विठ्ठल गिरी (वय 27) यांना अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT