देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. या पदांची निवडणूक बुधवारी देहूनगर पंचायत कार्यालयात पार पडली. स्थायी समितीच्या सभापतिपदी स्मिता शैलेश चव्हाण, तर सदस्यपदी पूनम काळोखे, पौर्णिमा परदेशी, सुधीर काळोखे, शीतल हगवणे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समिती सभापतिपदी सुधीर सुरेश काळोखे यांची तर सदस्य म्हणून आदित्य टिळेकर, पूजा दिवटे, मिना कुर्हाडे, ज्योती टिळेकर निवडण्यात आले.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी पूर्णिमा विशाल परदेशी या विजयी झाल्या. तर, प्रियांका मोरे, सपना जयेश मोरे, रसिका स्वप्निल काळोखे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती म्हणून शीतल अनिल हगवणे यांची निवड झाली. योगेश परंडवाल, मीना ़कुर्हाडे, प्रियांका मोरे व सपना मोरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
बांधकाम समिती सभापतिपदी पूनम विशाल काळोखे आणि सदस्यपदी पूजा काळोखे, ज्योती टीळेकर, मयूर शिवशरण व योगेश काळोखे यांची निवड करण्यात आली.
बुधवार, दि. 5 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, चार विषय समित्यांसाठी चारच अर्ज कायम रहिल्याने आणि कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने, शेवटी निवडणूक कार्यक्रमानुसार हवेलीचे प्रांत अधिकारी संजय आसवले आणि डॉ. प्रशांत जाधव यांनी दुपारी 4 वाजता चारही समित्यांच्या सभापतींची नावे जाहीर केली. या वेळी स्थायी समिति अध्यक्षा स्मिता चव्हाण, गटनेता योगेश परंडवाल, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.