File Photo 
पुणे

पिंपरी : नाशिक फाटा ते मोशीपर्यंत आठ पदरी एलिव्हेटेड मार्ग

अमृता चौगुले

पिंपरी : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पुणे-नाशिक महामार्गावर होणार्‍या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उन्नत मार्ग) तयार केला जाणार आहे. शहरातील या मार्गावरील नाशिक फाटा ते मोशी रस्ताच्या आराखड्याचे सादरीकरण प्राधिकरणाकडून महापालिका भवनातील आयुक्त दालनात गुरुवारी (दि.8) करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आ. अश्विनी जगताप, आ. उमा खापरे, शंकर जगताप व अधिकारी उपस्थित होते.

पुणे-नाशिक महामार्गावरील कासारवाडी, नाशिक फाटा, भोसरी, मोशी या परिसरात होणारी वाहतूक कोंडी व भविष्यातील नियोजनाबाबत सादरीकरण करण्यात आले. हा मार्ग आठपदरी आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंना दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे चार किंवा सहा लेनमध्ये सुधारणा करणे. सिंगल पिलवर टायर वन येथे आठ लेन एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येणार आहे.

प्रकल्प मुदतीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना
शहरातून जाणार्‍या नाशिक फाटा ते खेड या 29.81 किलोमीटर अंतराच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आठ पदरी रस्ता, मेट्रो लाइन, सर्व्हिस रोड, रॅम्प याचा समावेश आहे. या कॉरिडॉरमुळे पुण्यावरून येणार्‍या वाहनांना विनाअडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणार्‍या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी

रोड रॅम्प डाऊन वरून जाण्याच सुविधा असणार आहे. पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका असणार आहे. प्रकल्प मुदतीमध्ये पूर्ण करा. मेट्रो व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर
किवळे जंक्शन ते म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.6 किलोमीटर अंतरावर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरून चार आणि खालच्या बाजूने चार लेन असणार आहेत. त्यामुळे देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक व वाकडमधील वाहतूक कोंडी सुटणार आहे. मुळा नदीवरील पुलाच्या उजव्या बाजूला तीन लेन वाढविल्या जाणार आहेत. मुठा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला तीन लेन वाढविल्या जाणार आहेत. या मार्गाचे सादरीकरण राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT