पुणे

इंदापूर : खा. सुप्रिया सुळेंचे निष्ठावंत निघाले बाळासाहेबांच्या शिवसेनेत

अमृता चौगुले

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावान सहकारी म्हणून ओळख असणारे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष महारुद्र पाटील व त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते, पदाधिकारी बुधवारी (दि. 25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

पाटील यांनी सहा वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच कारकिर्दीत बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायती, सोसायटीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. मात्र. त्यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यामुळे पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याशी पाटील व पदाधिकार्‍यांची बैठक झाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी कोण पदाधिकारी कार्यकर्ते जाणार, याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

SCROLL FOR NEXT