पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या पुणे मुख्यालयात 10 नव्या इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी या बस येथे पाहायला मिळाल्या. मात्र, अद्याप त्या कोणत्या मार्गावर धावणार, कोणत्या आगारांना दिल्या जाणार, याबाबत निश्चितता नाही.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दुसर्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बस येण्यास सुरुवात झाली आहे.
दुसर्या टप्प्यातील पहिली बस मागील महिन्यात 24 तारखेला दाखल झाली, ही गाडी पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहे. या बससह आणखी बस आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पहिल्या बसची पाहणी पुण्यात गाडी आल्यानंतर एसटी महामंडळाच्या उपसरव्यवस्थापिका यामिनी जोशी यांनी केली होती.