तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्त : तळेगाव स्टेशन भागात नवरात्र उत्सवा निमित्त विश्व हिंदू परिषद,बजरंग दल यांच्या मार्गदर्शनानुसार नवरात्रास प्रारंभ झाल्यापासून रोज सकाळी दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे. जागोजागी दौडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत होत असून औक्षण केले जात आहे.
दौडीत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. दौडीत दुर्गामातासह देवदेवतांचा,भारत मातेचा, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष होत आहे.सदर दौड स्वराज नगरी,वतन नगर,स्टेशन चौक,निसर्ग सोसायटी,परिजात सोसायटी,टेल्को कॉलनी,राजगुरव कॉलनी,इंद्रायणी वसाहत,जोशी वाडी मनोहर नगर, आदी परिसरातील मार्गावरुन गेली आहे.