पुणे

‘ससून’मधील असुविधांमुळे नागरिकांची होतेय गैरसोय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ससून सर्वोपचार रुग्णालयातील असुविधांमुळे हेळसांड होत असल्याची तक्रार रुग्णांकडून कायमच केली जाते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनातर्फे तातडीने पावले उचलली जावीत, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पाठवण्यात आले आहे.
ससूनमध्ये अ‍ॅडमिशन व केस पेपरसाठी बिल्डिंग क्र. 40 येथे एकच खिडकी सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

पोलिसांसाठी व येरवडा कारागृहातील आरोपींसाठी वेगळे कक्ष तयार करावे, त्यामुळे प्रशासनावर ताण येणार नाही, या महत्त्वाच्या मुद्दयांकडे लक्ष वेधले आहे. ससूनमध्ये पिण्याच्या पाण्याचा पिंप आणि ग्लास यांची स्वच्छता राखावी, आय.सी.यू. किंवा इमर्जन्सीमधील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्याची व राहण्याची जागा उपलब्ध करून दयावी, , अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चाचे प्रचार-प्रसिध्दिप्रमुख विकी ढोले यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT