पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. यामुळे उत्तर भारतातून राज्याकडे येणार्या थंड वार्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. या बाष्पयुक्त वार्यामुळे राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या स्थितीमुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, थंडीचा कडका कमी झाला आहे. मात्र, सलग चौथ्या दिवशी जळगावात राज्यात नीचांकी म्हणजेच 8.6 तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारताकडून गेल्या काही दिवसांपासून वाहत असलेल्या थंड वार्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे किमान तापमानाचा पारा उणे सहा अंश सेल्सिअसच्या खाली उतरला होता. दरम्यान जम्मू-काश्मीरपासून ते उत्तर प्रदेशच्या दक्षिण-पश्चिम भागापर्यंत पश्चिमी चक्रावात आणि चक्रीय स्थिती आहे. मात्र राज्याकडे दक्षिण भारताकडून वाहत असलेल्या बाष्पयुक्त वार्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळेच राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र थंडी जाणवते आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस किमान तापमान सरासरीच्या आसपास राहणार आहे.
सलग चौथ्या दिवशी जळगावात पारा नीचांकी 8.6 अंशांवर
जम्मू-काश्मीर ते उत्तर प्रदेशपर्यंत पश्चिमी चक्रवात आणि चक्रीय स्थिती
शहर कमाल किमान
पुणे 31.5 16.2
जळगाव 31.3 8.6
कोल्हापूर 30.1 19.2
महाबळेश्वर 24.2 10.6
नाशिक 30.1 19.2
सांगली 30.6 18.2
सातारा 31.7 18.2
सोलापूर 33.3 18.8
मुंबई 32.8 22.6
रत्नागिरी 35 19.1
औरंगाबाद 30.5 11.2
नागपूर 29 12.4
गोंदिया 27.8 10.4