मद्यपी तरुणाचा शिक्रापुरात धिंगाणा; नशेत रस्ता जाम करण्याचा प्रकार Pudhari
पुणे

Shikrapur Drama: मद्यपी तरुणाचा शिक्रापुरात धिंगाणा; नशेत रस्ता जाम करण्याचा प्रकार

काही वाहनचालकांना व प्रवाशांना त्याने किरकोळ मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: मद्याची झिंग चढलेल्या एका तरुणाने शिक्रापूर येथे अहिल्यानगर-पुणे महामार्गावर मोठा धिंगाणा घातला. पीएमपीएमएल बसपासून ते चार चाकी वाहने रस्त्यात अडवुन मद्याच्या नशेत रस्ता जाम करण्याचा प्रकार त्याने घडविला.

काही वाहनचालकांना व प्रवाशांना त्याने किरकोळ मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे. ऋषिकेश कैलास सुकाळकर (रा. नेवासा फाटा, अहिल्यानगर) असे या युवकाचे नाव असुन शिक्रापूर पोलीसांनी फिर्यादी होत रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. (Latest Pune News)

किरकोळ मारहाण झालेल्या व्यक्तींनी देखील त्याच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांकडे धाव घेतली आहे. या मद्यपीचे प्रताप बघण्यासाठी शिक्रापूरमध्ये मोठी गर्दी झाली होती तसेच अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पीएमपीएमएल बस अडवून त्याच्या मागे तो पळत होता.

रस्त्याने जाणार्‍या अनेक चारचाकी वाहनांना थांबवून त्यांचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करत होता. घाबरलेल्या वाहन चालकांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे तो बोनेटवर बसून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांना खबर मिळताच त्याला शिक्रापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या मद्यपीची झिंग उतरताच आपल्याला काही काही आठवत नसल्याचे त्याने शिक्रापूर पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT