Sambhaji Bhide
भाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य Pudhari Photo
पुणे

वटपूजेसाठी नट्या, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; संभाजी भिडे यांचे वक्तव्य

sonali Jadhav

पुढारी वृत्तसेवा

वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनी जावे, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मंदिरात रविवारी भिडे यांनी धारकऱ्यांसोबत दर्शन घेतले. यावेळी धारकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. Sambhaji Bhide

भिडे म्हणाले, वारकरी, धारकरी हा संगम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करण्याचा आपला मानस आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा दहा हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतलेले लोक आपल्याला तयार करायचे आहेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरे स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले. भिडे यांना बजावली नोटीस

संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे धारकऱ्यांसोबत सहभागी होण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.

SCROLL FOR NEXT