पुणे

पुणे: पावसाळी चेंबर लाईनचे झाकण तुटल्यामुळे वाहतुकीस धोका : झाकण दुरुस्तीची मागणी

अमृता चौगुले

वारजे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: वारजे महामार्ग गार्डन सिटी येथून पुढे रोझरी शाळेसमोरील महामार्ग सेवा रस्त्यावरील पावसाळी वाहिनीचे सिमेंटचे झाकण तुटल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. ते झाकण तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गार्डन सिटी तसेच रोझरी शाळा परिसरालगत मोठ्या सोसायट्या आहेत. हा परिसर वारजे माळवाडी व महामार्ग भागाला जोडणारा व रहदारीचा मार्ग असून या रस्त्यावरून नेहमीच अवजड वाहनांसह नागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तुटलेल्या सिमेट ब्लाॅकच्या झाकणामुळे येथील वाहतुक धोकादायक झाली आहे. राञीच्या वेळी वाहनांना तसेच पादचारी नागरीकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महामार्ग प्राधिकरणाकडून तातडीने या ठिकाणावरील पावसाळी वाहीनीचे सिमेंटचे झाकण तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT