डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी विज्ञान, महिलांचे प्रश्न, आरोग्य यावर सकस लेखन केले आहे. Facebook
पुणे

Dr. Shantanu Abhyankar | 'स्वतःच्याच कॅन्सरवर तुम्ही लेख लिहिला, हे तुम्हीच करू शकला'

सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे गुरुवारी (१५ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या या भावना

पुढारी वृत्तसेवा
निशा फडतरे

भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहावंसं वाटतं नाहीये. मुळात या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. आजारपणात कोणी कितीही समजूत काढली तरी शंतनू डॉक्टर बोलले की मगच बरं वाटायचं. झरूच्या जन्माच्या वेळी डॉक्टर म्हणाले यायचं असेल तर वाईला या, डिलिव्हरी इथे करू. साधारण 60 ते 70 km चा प्रवास करून मी तातडीने तिथे गेले. तिथं गेल्यावर मात्र समाधान मिळालं. शिवाय OT मध्ये सचिनला डॉक्टरांनी स्पेशल एन्ट्री दिली. शिवाय डिलिव्हरी नंतर सगळं फार सोप्प गेलं.

डॉक्टर माझ्या घरच्यांना म्हणाले, "माझ्या हॉस्पिटल मधे जन्मलेल्या मुलांची पाचवी पूजली जात नाही." अगदी हसत खेळतं पटवून दिलं सगळं.

त्यानंतर झरुची आपुलकीने चौकशी करतं. तिचे व्हिडिओ पहिले की खूष व्हायचे. तुम्हांला 100 पैकी 100 मार्क म्हणायचे. ती तिच्या पहिल्या वाढदिवसाला तुमच्या ताटात जेवली पाहिजे, याची तयारी आधीपासून करायची असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.

'रडण्यापेक्षा तू सचिनशी भांडत जा'

एक वर्षाने झरू भयंकर आजारी पडली. ताप एवढा वाढला की तिला अॅडमिट करावं लागलं. Fever convulsion झालं होतं.

मला तर काही सुचतं नंव्हतं. झरुची तडफड बघवत नव्हती. डॉक्टर येऊन भेटायचे. तापात असं बरेचदा होतं हे सांगायचे पण जीव नुसता घाबरायचा. कोणी काही विचारलं की डोळ्यात घळघळ पाणी यायचं. Parents history मध्ये सचिनला पण असं कधी कधी व्हायचं हे लक्षात आले. मला स्वतःला सावरायला धीर येत नव्हता. सचिनने शंतनू डॉक्टरांना फोन केला. नंतर डॉक्टर फोनवर माझ्याशी बोलायला लागले. त्यांच्याही मुलांना हा त्रास व्हायचा हे सांगत होते. नंतर म्हणाले, "तुला सांगतो तू रडण्यापेक्षा सचिनशी भांडत जा. तुझ्या मुळे हे झालंय असं म्हणायचं आणि भांडत बसायचं."

एवढ्या कठीण परिस्थितीत डॉक्टर इतकं कसं हसत खेळत राहू शकतात याचं कौतुक वाटायचं. त्यांच्या कॅन्सरची बातमी लिहणारा त्यांचाच लेख जेव्हा वाचला तेव्हा वाटलं हाच माणूस फक्त हे करू शकतो.

'Emotional numbness आला आहे'

आत्ता आत्ता कोलकत्ताला येण्याआधीच मार्चमध्ये आवर्जून भेट झाली. तेव्हा ही उत्साह कायम. एवढ्या लवकर हे घडेल असं वाटतं नाहीये अजूनपण.

आता वाटतंय एक रिकामेपण.

झरू काल परत आजारी पडली. प्रचंड ताप चढला. अॅडमिट करावं लागलं. सचिनसोबत नव्हता त्याच्या इथल्या मित्रांनी तातडीने हॉस्पिटलमधे अॅडमिट करायला मदत केली. यावेळी मी आणि माझी मैत्रीण फक्त दोघीच होतो. सगळं आवसान गळल्यासारखं झालं. डॉक्टरांची आठवण येत होती. अशातच फेसबुक व्हाट्सअप वर डॉक्टरांच्या जाण्याची बातमी कळाली. नक्की काय होतंय माझ्यासोबत कळत नव्हतं. Emotional numbness जाणवायला लागला.

शंतनू अभ्यकरांनी त्यांच्या जाण्याची मानसिक तयारी आधीपासून सर्वांची करून ठेवली होती. म्हणून किमान एवढं लिहिता आलं.

Miss you डॉक्टर

Miss you डॉक्टर.

या महिन्यात तुमचं पुस्तकं झरूच्या हाती आलंय. 'शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी.'

भुपी आणि झंम्प्या ही दोन पात्र झरुची खूप लाडकी आहेत. यातल्या गोष्टी झरू स्वतः रंगवून रंगवून वाचते.

हे डॉक्टरांना पाठवून देऊ थोडं एडिट करून असं वाटलं पण ही संधी गेली.

सगळ्या वयोगटासाठी डॉक्टरांनी लिहून ठेवलंय. हल्ली त्यांनी त्यांच्या नातीसाठी म्हणजे इरासाठी लिहिलेली बडबड गीतं पण भारीयेतं. डॉक्टरसोबत आहेत आता त्यांच्या गोष्टी पण परत परत सांगतील. डॉक्टर तुम्ही आमचा आधार आहात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT