पुणे

पुणे : पंचनाम्यावेळी आरोपीने दाखविले मार्ग; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

अमृता चौगुले

पुणे : 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने पंच म्हणून बोलावले होते. पंचनाम्यादरम्यान आरोपी सचिन अंदुरे याने गाडीतून शिवाजीनगर बस स्टॅण्डपासून ओंकारेश्वर पूल, भिडे पूल असे सर्व मार्ग आणि ठिकाणे दाखविली,' अशी साक्ष बँक अधिकारी विशाल माईनकर यांनी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात दिली.

सीबीआयने पंच म्हणून उपस्थित केलेल्या माईनकर यांची साक्ष शनिवारी (दि.17) नोंदविण्यात आली. 'सीबीआयने पंच म्हणून बोलाविले असल्याचे बँकेला कळविले होते. बँकेच्या ऑर्डरप्रमाणे मी रेल्वे स्टेशनवर गेलो. त्याठिकाणी जीआरपी पोलिस स्टेशनच्या बाहेर थांबलो असता, तिथे सीबीआयचे अधिकारी भेटले. गाडीमध्ये सचिन प्रकाशराव अंदुरे होता.

सर्व सीबीआयचे अधिकारी व कर्मचारी होते. सचिन अंदुरे दाखवेल त्याप्रमाणे गाडी पुढे जात होती. पहिल्यांदा त्याने शिवाजीनगर बस स्टँड दाखविले. त्यांतर जंगली महाराज रस्ता मार्गे ओंकारेश्वर पूल, अमोल जनरल स्टोअर्स, अमेय अपार्टमेंट, कॉसमॉस बँकेवरून भिडे पूलमार्गे राजा मंत्री चौक दाखविला. कर्वेनगरमध्ये गेल्यानंतर कमिन्स कॉलेज येथे पंचनामा थांबला,' असे माईनकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT