पुणे

तळेगाव येथील डीपीरोड झाला अस्वच्छ

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील डीपीरोड कचरा टाकणा-या नागरिकांमुळे अस्वच्छ झाला आहे. हा रोड जोशीवाडी येथून निघून तळेगाव-चाकण महामार्गास मिळतो.निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे व वाहतूक कमी असल्यामुळे पहाटे पासून सकाळपर्यंत अनेकजेष्ठ नागरिक,तरुण,शालेय विद्यार्थी,मुले-मुली महिला मॉर्निंग वॉकसाठी आणि सायंकाळी फिरणेसाठी येतात अनेकजण सायकलींगही करतात. परंतु डीपीरोडच्या कडेला जागोजागी नागरिक कचरा टाकत असल्यामुळे तेथे उकिरड्याचे स्वरुप आलेले आहे.

वास्तविक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या सगळ्यांच्या घरांजवळ येतात अशी सोय असताना अनेकजण त्या गाडीत कचरा न देता रात्री अपरात्री किंवा शुकशुकाट असताना डीपीरोडच्या कडेला कचरा टाकतात यामुळे डीपीरोडचे स्वरुप बदलले असून तेथे जागोजागी कचराटाकण्यात येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे तेथे भटकी कुत्री आदी प्राण्यांचा तसेच साप,घुस,उंदीर अशा प्राण्यांचाही वावर आहे तसेच यामुळे डासांचेही प्रमाण वाढले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आहे.तरी प्रशासनाने तेथील कचरा उचलण्याबाबत आणि परत तेथे कचरा कोणीही टाकू नये याबाबत कडक कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

डीपीरोडच्या कडेला अनेकजण कचरा टाकत आहेत याबाबत प्रशासनाचे निदर्शनास ही बाब आणली आहे.तरी कचरा उचलण्या बाबत आणि परत कचरा टाकू नये याबाबत कडक कार्यवाही करावी.
                                                      अनिल वेदपाठक सामाजिक कार्यकर्ता.

अंधारात अनेकजण डीपीरोडच्या कडेला कचरा टाकतात तरी प्रशासनाने यावर बारकाईने लक्ष ठेवून उपाययोजना करावी.
                                                                       विठ्ठल भेगडे,जेष्ठ नागरिक

SCROLL FOR NEXT