पुणेः शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दिवाळी पाडवा शनिवार, दि. २नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा पर्व १३ वे नव तपपूर्तीची सुरुवात होणार आहे. याचे आयोजन श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस शाळा प्रांगण, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. दीपोत्सवाचे उद्घाटन शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
श्रीमंत देवराव राजे हांडे, श्रीमंत भोईटे सरकार, श्रीमंत सरदार बापूजी मांढरे ह्या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागााची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच राजे साळुंखे चालुक्य राजवंव, स्वराज्यनिष्ठ बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.
दीपोत्सवाचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, किरण देसाई, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.