पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १२ ते १८ जानेवारीदरम्यान पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश सुरू झाल्याची माहिती संयोजन सचिव अभिजीत चांदगुडे आणि पीवायसी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू यांनी दिली.
स्पर्धेचे १६ वे वर्षे असून ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात ही स्पर्धा होणार आहे. त्यानंतर पुरुष, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही मोठी स्पर्धा असणार आहे. ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० वर्षांवरील गटातही ही स्पर्धा होणार आहे. आजपर्यंत आयोजकांकडून १६ खेळाडूंना स्कॉलरशिप देण्यात आली असून, या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.