पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरातील वाचकांना वृत्तपत्र वाटप करणार्या 200 विक्रेत्यांना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, संपदा सहकारी बँक व द शेलार ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने टीव्हीएस ई-व्हेईकलचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मुळशी वाणीभूषण ह.भ.प. ऋषीकेश चोरगे महाराज, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, जिल्हा परिषद माजी सदस्य नवनाथ पारगे, संपदा सहकारी बँकेचे चेअरमन अश्विनकुमार उपाध्ये व संचालक मंडळ, संघटनेचे अध्यक्ष विजय छबुराव पारगे, रोहित विश्वकर्मा, प्रदीप सावंत, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे विक्रेते व संपदा बँकेचे संचालक जगन्नाथ कुलकर्णी तसेच सर्व दैनिकांचे प्रतिनिधी, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी व विक्रेते बंधू-भगिनी उपस्थित होते.
द शेलार ऑटोमोबाईल्सच्या वतीने अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार करत प्रत्येक विक्रेत्यास रु 1000 निधीचा धनादेश वृत्तपत्र विक्रेता कल्याण निधीसाठी जमा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले, सचिन गायकवाड, अनंता केंडे, सचिन मुंगारे, सुनील म्होकर, दिलीप निंबळे, सुहास धनकुडे, मंगेश जगताप, सुमित पारगे यांसह विक्रेते उपस्थित होते.
विजय पारगे म्हणाले, की गुरुजींकडून वाहनांची पूजा सर्व विक्रेते बंधूंनी करून घेतली. वाहन मिळाल्याचा आनंद विक्रेते व परिवारातील सर्व सदस्यांच्या चेहर्यावर दिसत होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये गाडी घेणे, त्यासाठी लागणारे कर्ज कमी व्याजदराने व कर्जासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता, यासाठी लागणारा कालावधी या सर्वांचा सारासार विचार करीत संघटनेने विक्रेत्यांना सरासरी आठ टक्के दराने वाहन कर्ज मिळवून दिले. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याचे 15 हजार रुपये वाचले आहेत."