तळेगाव दाभाडे : दिव्यांगबांधवांना तीन हजार रुपये मासिक अनुदान देण्यास मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी तत्त्वतः लेखी मान्यता दिल्याने दिव्यांगबांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळावे, अशा मागणीचे निवेदन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांना दिव्यांगबांधवांनी दिले होते.
तसेच, समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष कल्पेश भगत, माजी नगरसेवक सुनील कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी, राजेंद्र थोरात, मनोज हब्बू, निखिल बोत्रे रंजना गोडसे, विठ्ठल हिंनकुले आदींनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. या वेळी तीन हजार रुपये मासिक अनुदान तीन टप्प्यात देण्याचा लेखी निर्णय करण्यात आला.