पुणे

पिंपरी : पालिका भवन सीमाभिंतीवरील म्युरल्सची दुरवस्था

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या सीमाभिंतीच्या सुशोभीकरणासाठी सुंदर म्युरल्स उभारण्यात आले आहेत. त्याची निगा राखली जात नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. पालिका भवन सुशोभीकरणासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या बाजूच्या सीमाभिंतीवर पालिकेने आकर्षक म्युरल्स लावले आहेत. त्यात उद्योगधंदे, भक्ती-शक्ती शिल्प, मोरया गोसावी मंदिर, आयटी पार्क, मेट्रो, बीआरटी मार्ग, उड्डाणपूल आदी आकर्षक कलाकृती आहेत.

लोखंडात बसविलेले या कलाकृती उखडण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कलाकृती विद्रुप झाली आहे. तसेच, नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच, स्वच्छाग्रहाचा लावलेल्या लोगोची तोडफोड करण्यात आली आहे. हे म्युरल्स व लोगो दुरुस्त करून सुशोभीकरण करण्याची मागणी
होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT