सासवड : पुढारी वृत्तसेवा : कोणी दमदाटी करीत असेल तर त्याला लोकशाही पद्धतीने उत्तर देईन, 'अरेला का रे' करणार नाही, घरातली उणीदुणी काढायला राजकारणात आले नाही, सोबत कुणी नसेल तर सत्ता आणि पैसा घेऊन करणार काय तुम्ही! आपली पक्ष आणि चिन्ह, याची लढाई आपण करीत राहणार. मी बारामती लोकसभा तिकीट सोडून काहीच मागितले नाही. त्यांनी काही मागितले असते तर असे देऊन टाकले असते, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा व पदनियुक्ती समारंभ पार पडला, त्या वेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
या वेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा महिलाध्यक्षा भारती शेवाळे, विजय कोलते, सुदाम इंगळे, बबन टकले, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, बबूसाहेब माहुरकर, श्यामकांत भिंताडे, जयदीप बारभाई, पुष्कराज जाधव, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, योगेश फडतरे, युवराज जगताप, गौरी कुंजीर, नीता सुभागडे, अतुल जगताप आदी उपस्थित होते. खा. सुळे म्हणाल्या की, माझी कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की, शरद पवार यांना पोरीला मुख्यमंत्री बनवायचे आहे आणि सोनिया गांधी यांना पोराला पंतप्रधान बनवायचे आहे.
पण, असे काही नाही. या वेळी संभाजी झेंडे, विजय कोलते, सुदाम इंगळे यांची भाषणे झाली. राहुल गिरमे, विनोद जगताप, आकाश शिळीमकर, ॠषिकेश झेंडे, सयाजी वांढेकर, चेतन मेमाणे, अमोल कामठे, गोरख शेंडकर, प्रदीप खळदकर, सुशांत कामठे, गणेश होले, विजय फडतरे, महेश किरवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माणिक झेंडे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर यांनी केले. पुष्कराज जाधव यांनी आभार मानले.
हेही वाचा