पुणे

पुणे : क्षयरोगाचे निदान आता होणार अधिक सोपे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : क्षयरोग (टीबी) निदान किट आणि संयंत्र तयार करण्यात आले आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) परीक्षणानंतर त्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले आहे. यामुळे निदानपद्धती अधिक सोपी, सहज आणि किफायतशीर होणार आहे. या किटची निर्मिती 'मायलॅब सोल्यूशन्स'ने केली आहे. या किटमुळे क्षयरोगनिर्मूलन कार्यक्रमाला चांगली गती मिळू शकते. 'ड्रग रेझिस्टन्स' अर्थात औषधे निष्प्रभ होण्याचे प्रमाण पाहता क्षयरोगासाठी कोणती औषधे प्रभावी ठरू शकतात, याची चाचणीही या संयंत्राद्वारे केली जाणार आहे.

'मायलॅब'चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले, 'एकाच वेळी अनेक समस्यांचे समाधान शोधण्याचे काम आम्ही करीत आहोत. निदानाचा वेग वाढविण्याबरोबरच ती अधिक स्वयंचलित आणि एकाचवेळी अनेक चाचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. निदानातील अचूकता 95 टक्के, स्वयंचलित पीसीआर सेटअप, एकाचवेळी अनेक चाचण्या, क्षयरोगाबरोबरच निष्प्रभ ठरणार्‍या औषधांचेही निदान, ऑनलाइन रिपोर्ट आणि डेटा स्टोअरेज सिस्टिम, पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण आणि नोंदणी ही या किटची वैशिष्ट्ये आहेत.

SCROLL FOR NEXT