पुणे

हडपसर : सांडपाण्याच्या दुर्गंधीने भाविकांची गैरसोय

अमृता चौगुले

हडपसर; पुढारी वृत्तसंस्था : मगरपट्टा चौकातील चंद्रमौलेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. मात्र, लोहिया उद्यान कॉर्नर परिसरात सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. वानवडी क्षेत्रीय कार्यालय व ड्रेनेज विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला.

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाची हद्द मगरपट्टा उद्यानापर्यंत आहे. या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिराशेजारी ड्रेनेजलाइन फुटल्याने मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गैरसोय झाली. मंदिर व्यवस्थापाने याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा सहायक आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. या सांडपाणी वाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मंदिर व्यवस्थापनचे अध्यक्ष नीलेश मगर यांनी सांगितले की, मंदिराच्या शेजारून महापालिकेची ड्रेनेजलाइन जाते. ती अनेक वेळा फुटून मंदिरासमोरून सांडपाणी वाहत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम झाले नाही.

लोहिया उद्यान व चंद्रमौलेश्वर मंदिराच्या परिसरातील सांडपाणी वाहिनी फुटली आहे. ती लवकरात लवकर दुरुस्त करून भाविक व नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

                                               – शाम तारू,
                                          सहायक आयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT